ममुराबाद -: दि. १५ ममुराबाद येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर मोठ मोठे खड्डे खोदल्याने गरोदर महिला तसेच वयोवृद्ध. लहाण बालक यांना उपकेंद्रामध्ये जातांना मोठी कसरत करावी लागत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि ममुराबाद येथील नविन ग्रामसचिवालयाचे काम सुरु असल्याने कॉलम साठी उपकेंद्राच्या समोरील बाजुस सुमारे सात ते आठ फुट खोल असे खड्डे खोदण्यात आले आहे.
आज सकाळी गोरख देवराम कोळी हे त्यांच्या मुलीचा रिपोर्ट घेण्यासाठी उपकेंद्रात गेले असता उपकेंद्रामध्ये जातांना अक्षरशः तारेवरची कसरत करत प्रवेश करावा लागला.उपकेंद्रात प्रवेशासाठी जागा उपलब्ध नाही. जी.जागा उपलब्ध आहे, ती आतमध्ये प्रवेश करण्यासाठी पुरेशी नाही. उपकेंद्रात गरोदर महीला, प्रसुतीसाठी येणाऱ्या महीला, प्रसुत झालेल्या महीला, तसेच लसिकरणासाठी येणारे लहान मुल यांना कसरत करून प्रवेश करावा लागत आहे.अश्या अवघड जागेतुन व खड्डा चुकवत उपकेंद्रात येणाऱ्या नागरीकांचा खड्डयात पडुन अपघात-झाला तर याला जबाबदार कोण ?असा प्रश्न उपस्थीत होत आहे.
ग्रा.पं. कार्यालयासाठी, तलाठी कार्यालयासाठी पर्यायी जागा मिळू शकते तर उपकेंद्रासाठी का नाही. गावातील नागरीक महीलाचा त्रास थांबवावा यासाठी लवकरात लवकर पर्यायी रस्ता करून द्यावा अशी मागणी गोरख कोळी यांनी ग्रामपंचायतीकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.












