ममुराबाद येथील ग्रा.वि अधिकारी कुंदन कुमावत यांचेवर कारवाई न झाल्यास करणार उपोषण.वेगवेगळ्या ग्रामपंचायती मध्ये ग्रामपंचायतीच्या दप्तरामध्ये हेराफेरी,

0
38

ममुराबाद – येथील ग्रामविकास अधिकारी कुंदन उत्तम कुमावत यांचेवर सन २०१७ पासुन आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या दप्तरांमध्ये हेराफेरी करण्या संदर्भात विविध तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत परंतु त्यांचेवर आजपावेतो कोणत्याच प्रकारच्या तक्रारी बाबत चोकशी करून कारवाई करण्यात आलेली नसल्याने प्रशासन त्यांचेवर एवढे मेहरबान कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. ममुराबाद ग्रामपंचायत मध्ये सन २०१७ मध्ये ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या प्रोसीडींग मध्ये हेराफेरी करून सरपंच लक्ष्मी हेमंत चौधरी यांचा रजेचा अर्ज मंजुर करून घेतला सदर तक्रार मालुबाई प्रभुचंद्र पाटील यांनी मा. अप्पर आयुक्त नाशिक यांचे कडे दाखल केली होती. त्यात ग्रामविकास अधिकारी यांचेवर दप्तरामध्ये हेराफेरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तसेच ममुराबाद येथे सन २०१९ मध्ये कोणत्याही सक्षम अधिकार्‍याची परवानगी न घेता ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये दिशाभुल करणारे कागदपत्र जोडुन निव्वळ स्वताच्या आर्थिक स्वार्थापोटी व ग्रा.पंचायतीच्या सदस्यांची दिशाभुल करून कागदपत्रांनमध्ये ७/१२ उतारा जोडुन ग्रामविकास अधिकारी कुंदन कुमावत व सरपंच यांनी कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता प्रभावती टोपलु सोनवणे यांचे नाव नमुना नं ८ ला लावलेले आहे.अतिक्रमण नियमानुकुल करतांना कुंदन कुमावत यांनी सर्व शासन निर्णय धाब्यावर बसवले आहे. याप्रकरणामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याने सदरील अतिक्रमण बेकायदेशीर नावे लावण्यात आलेले आहे.

त्याचप्रमाणे कुंदन कुमावत यांचेकडे कडगाव ता.जि. जळगाव येथील अतिरिक्त चार्ज असतांना कडगाव येथील बसस्टँड परिसरातील ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा नमुना नं.८ मध्ये फेरफार करून सदर अतिक्रमण धारकाचे नाव नमुना नं. ८ चे पाने बदलुन त्यामध्ये नविन पानावर अतिक्रमण धारकाचे नाव सरला उत्तम कोळी असे लिहीलेले आहे. सदर विषयाबाबत कडगाव येथील नागरीकाने सर्व प्रकार उघडकीस आणला सदर प्रकरणाची गटविकास अधिकारी यांचे कडे तक्रार केली असता कुंदन कुमावत यांचे कडुन कडगाव येथील पदभार काढुन घेण्यात आला आहे. सदर प्रकरणाची पंचायत समिती सभापती यांनी शहानीशा केली असता नमुना नं.८ चे पाने काढुन त्या ठिकाणी नवीन पाने लावलेली आहे. याबाबत कुंदन कुमावत यांनी गायत्री एंटरप्रायझेस यांचे नाव सांगितले. या बाबत गायत्री एंटरप्रायझेस चे मालक यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की कुंदन कुमावत माझ्याकडे आले व नमुना नं. ८ चे पेज माझ्याकडुन बदलवून घेतले. अशी कबुली त्यांनी दिलेली आहे. यामध्ये सुध्दा मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे कडगाव येथील नागरिकांकडून बोलले जात आहे. अशा प्रकारच्या तक्रारी प्रशासणाच्या लक्षात आणुन दिल्यानंतर देखील संबंधीत ग्रामविकास अधिकारी कुंदन कुमावत यांच्यावर जि.प. व पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी मेहरेबान कसे ? आणि जर कुंदन कुमावत यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ठ झालेले असेल आणी त्यांचेवर कारवाई होत नसेल तर नक्कीच जि.प किंवा पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सुध्दा वाटा (हिस्सा) त्यांच्या मध्ये असावा यात शंकाच नाही.

वरिल सर्व विषयाची सखोल चौकशी करून संबधीत ग्रामविकास अधिकारी कुंदन उत्तम कुमावत यांना येत्या पंधरा दिवसाचे आत सेवेतुन बडतर्फ करावे. त्यांचेवर आपल्या स्थरावरून कारवाई न झाल्यास भ्रष्ट्राचार निवारण समितीच्या वतिने जि.प. कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल अशी मागणी भ्रष्ट्राचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि प जळगाव यांचेकडे केली आहे.

Spread the love