ममुराबाद येथील नियमबाह्य झालेल्या शोचालयाची पंधरा दिवसात चौकशी न झाल्यास करणार उपोषण, सौ प्रीतम ज्ञानेश्वर पाटील.ग्रामपंचायत सदस्या.

0
9

जळगाव – तालुक्यातील ममुराबाद ग्रामपंचायत मधील 14 वित्त आयोग आंतर्गत कृती आराखड्यामध्ये सार्वजनिक महिला शौचालय वॉर्ड क्रमांक 1 व 5 मध्ये मंजूर होते. परंतु सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी मनमानी कारभार करून सदर महिला शौचालय वार्ड क्रमांक 3 मध्ये बांधकाम करून वार्ड क्रमांक 1 व 5 मधील महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतेचा आणि आरोग्याचा अत्यंत महत्वपूर्ण अशा विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

सरपंच तथा ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने नियमबाह्य या स्वरूपाच्या केलेल्या कामाबाबत सौ प्रितम पाटील यांनी दिनांक 15/9 /2021 रोजी लेखी स्वरुपात तक्रार दिलेली आहे. सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी संगनमताने फक्त आर्थिक हितासाठी वार्ड क्रमांक एक व पाच मधील महिलांचा सार्वजनिक स्वच्छतेचा आणि आरोग्याचा कुठलाही विचार न करता फक्त आणि फक्त आर्थिक हितासाठी

शासनाच्या 14 वित्त आयोगाचे पाच लाख रुपये खर्च करूण एक प्रकारे त्या निधीचा अपव्यय केलेला आहे.

वार्ड क्रमांक एक व पाच मध्ये महिला शौचालय नसल्यामुळे तेथील नागरिकांनी आणि महिलांनी ग्रामसभेमध्ये लेखी स्वरुपात मागणी केली होती. परंतु सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी 14 वित्त आयोगातील कृती आराखड्या मध्ये मंजुर असलेल्या आणि ग्रामसभेला महत्व न देता मनमर्जी कारभार करून सर्व नियम धाब्यावर बसवून नियमबाह्य कार्य केलेले आहे. वार्ड क्रमांक एक व पाच मधील महिलांना सार्वजनिक महिला शौचालय नसल्यामुळे त्यांना सार्वजनिक स्वच्छतेचा आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरूपात निर्माण झालेला आहे. आणि सदर झालेल्या नियमबाह्य कामामुळे त्यांना कायमस्वरूपी च्या सार्वजनिक स्वच्छतेचा आणि आरोग्याचा प्रश्न हा कधीही न सुटण्यासारखा दिसून येत आहे. सदर विषयाचे जि प कार्यालयाकडे दिनांक 15 /09/2021 रोजी लेखी स्वरुपात तक्रार सादर केलेली असून आपल्या कार्यालयात कडून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याचे दिसून येत आहे.

त्याच तक्रारी संदर्भात दिनांक 14 /12 /2021 रोजी स्मरणपत्र सादर केलेले आहे.

सदर प्रकरणामध्ये आपल्या कार्यालयाकडे वेळोवेळी तक्रारी देऊन सुद्धा प्रकरणाची कोणत्याच प्रकारे दखल न घेतल्यामुळे. येत्या पंधरा दिवसात चौकशी करून कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल व होणार्‍या परिणामास आपणास जबाबदार धरण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन सौ प्रितम पाटील ग्रा पं सदस्या ममुराबाद यांनी जि. परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे केली आहे.

Spread the love