मनोज जरांगेंची जळगावात होणार जाहीर सभा

0
101

जळगाव – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांचा राज्यात सर्वत्र दौरा सुरू आहे. सकल मराठा समाजातर्फे शहरात ३ डिसेंबर रोजी श्रीराम मंदिर संस्थानच्या जागेत (मानराज पार्कलगत) मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

खान्देश दौऱ्यात त्यांची धुळे व जळगावात सभा होणार आहे. जळगावात सायंकाळी ७ वाजेची वेळ दिली असली तरी चाळीसगाव व पारोळ्यात समाज बांधवांची भेट व धुळ्यातील सभा यामुळे जळगावातील सभेला उशीर होऊ शकतो. मात्र सभेसाठी कामाला लागा, असे जरांगे-पाटील यांनी सूचित केले असल्याची माहिती राम पवार यांनी दिली आहे.

Spread the love