दिपक नेवे
यावल -मनवेल येथे रामायणकार महर्षि वाल्मीक जंयती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यलय मनवेल
मनवेल येथील ग्रामपंचायत कार्यलयात सरपंच जयसिंग सोनवणे यांचा हस्ते आद्य कवी महर्षि वाल्मीक याचा प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी उपस्थित होते.
महर्षि वाल्मीक चौक
येथील बसस्थांनक जवळ थोरगव्हाण माजी उपसरपंच समाधान सोनवणे यांचा हस्ते महर्षि वाल्मीक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले तर संदिपभैया सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वढोदा सरपंच संदिपभैया सोनवणे, मनवेल सरपंच जयसिंग सोनवणे ,वढोदा येथील नानाभाऊ सोनवणे,पो.पा.विठ्ठल कोळी,सामाजिक कार्यकर्ता गोविंद पाटील, गणेश कोळी,पत्रकार गोकुळ कोळी, देविदास कोळी सतीष कोळी,गोकुळ सोनवणे ,डीगंबर तायडे ,रविद्र तायडे , भगवान कोळी सह ग्रामस्थ उपस्थित होते.
जि.प.शाळा मनवेल
येथील जि.प.प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समीतीचे माजी अध्यक्ष गणेश कोळी गोकुळ कोळी यांचा हस्ते महर्षि वाल्मीक यांचा फोटोचे पुजन करण्यात आले.यावेळी उपशिक्षक सुनिल काळे यांनी रामायणकार महर्षि वाल्मीक यांचा विषयी मनोगत व्यक्त केले तर प्रास्तविक मुख्यध्यापक ज्योति चौधरी यानी केले तर प्रविण पाटील यांनी आभार मानले.