दिपक नेवे
मनवेल येथील कै.व्हि.व्हि.तांबट अनुदानित आश्रम शाळेत आदीवासी विकास प्रकल्प कार्यलय यावल अंतर्गत खावटी कीट वाटप वढोदा प्र यावल येथील युवा सरपंच संदिपभैया सोनवणे व संस्थेचे अध्यक्ष हुकुमचंद पाटील यांचा हस्ते लाभार्थाना वाटप करण्यात आले.
यावल आदीवासी विकास प्रकल्प कार्यलय अंतर्गत मनवेल येथील अनुदानित आश्रम शाळेत संस्थेचे अध्यक्ष हुकुमचंद पाटील यांचा अध्यक्षस्थानी खावटी कर्ज योजना अंतर्गत कीट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वढोदा ग्रामपंचायत सरपंच संदिपभैया सोनवणे, ग्रामपंचायत सदस्यं सुक्राम सोनवणे ,संस्थेचे सचिव मिराबाई पाटील, संचालक मंगलराव पाटील, पत्रकार गोकुळ कोळी उपस्थित होते.
आदीवासी लोकांना कोवीड १९ च्या प्रादुर्भाव मध्ये रोजगार उपलब्ध नसल्यामुळे उपासमार होऊ नये म्हणून आघाडी सरकारने अनु.जमाती च्या लोकांना खावटी कर्ज योजना अंतर्गत दोन हजार रुपये रोख व दोन हजार रुपयात कीराणाचे कीट वाटप करण्यात येत असल्याने आदीवासी जनतेने या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रर्येक लाभार्था पर्यत आदीवासी विभागाने शोध घेतला व गरजूना खावटी कीट वाटप प्रंसगी संदिपभैया सोनवणे यांनी खावटी कीट वाटप प्रंसगी बोलताना सागीतले.यावेळी शाळेचे अधिक्षक वसंत पाटील, मुख्यध्यापक सचिन पाटील, संजय अलोणे, सारीता तडवी सह शाळेतील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते प्रास्तविक व सुत्रसंचालन राकेश महाजन यांनी केले तर आभार सुभाष पाटील यांनी मानले.