मन्यावाडी या आदिवासी वस्तीत, “पत्रकार दिन” आरोग्य शिबीर व शॉल वाटुन साजरा 

0
15

चोपडा – तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात भारतीय पत्रकार महासंघ च्या वतीने आरोग्य शिबीरात आदिवासी बंधुची तपासणी करून व थंडीचे शॉल पत्रकार दिन साजरा केला. रावेर लोकसभेच्या खासदार व कार्यक्रमाचे अध्यक्ष रक्षा खडसे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उदघाट्न व थंडीचे कांबळ वाटप करण्यात आल्या.

जनसमान्याचा आधार स्तभ म्हणजे भारतीय पत्रकार महासंघ या पुष्टी प्रमाणे मागील वर्षा प्रमाणे आदिवासी भागात भारतीय पत्रकार महासंघ च्या वतीने पत्रकार दीनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्या वेळी खासदार रक्षा खडसे यांनी सर्व आदिवासी बंधूना मिळणाऱ्या शासनाच्या योजना बाबत चौकशी करून मोफत रेशन, उज्ज्वला गॅस योजनेची माहिती देऊन संबंधित अधिकारी यांना आदेशानुसार त्वरित शासकीय योजनेचा लाभ परिसरातील सर्व आदिवासी बंधूना मिळावा अश्या सूचना करण्यात आल्या, यावेळी प्रकाश सरदार यांनी आदिवासी बंधूना शिक्षणाचे महत्व पटवून दिले आदिवासी बांधवाचे त्यांचे हक्क घटनेत काय आहेत याबाबत मार्गदर्शन केले सदरचा कार्यक्रमाचे नियोजन भारतीय पत्रकार महासंघ चोपडा तालुक्याच्या वतीने करण्यात आला होता.

या कार्यक्रमांस प्रमुख मान्यवर मान्य वस्तीचे प्रमुख मान्याझिंगा बारेला, भारतीय पत्रकार महासंघाचे अध्यक्ष नवलसिंग राजपूत, उपाध्यक्ष राकेश कोल्हे, सल्लागार प्रकाश सरदार, दैनिक बातमीदारचे संपादक हेमंत पाटील, चंद्रशेखर पाटील, मगन बाविस्कर, गजेंद्र जयसवाल, गोविंदराव सैदाणे, राकेश पाटील,उत्तर महाराष्ट्र चे अध्यक्ष विलास पाटील, चोपडा तालुका अध्यक्ष तुषार सूर्यवंशी, तालुका सचिव तौसिफ़ खाटीक, सह स्थानिक पत्रकार पी.आर. माळी, मनोज मोरे, जितेंद्रकुमार शिंपी, मनोहर देशमुख,भगवान न्हायदे, रावसाहेब पाटील, राजेंद्र चोधरी, प्रशांत सोनवणे, राजेंद्र बोदडे,आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, गट प्रमुख एलीजा मोरे, आशा वर्ककर राहाबाई बारेला, आरोग्य सेविका भिकूताई बोदडे, कार्यक्रम चे आभार पी. आर. माळी सर यांनी केले.

Spread the love