प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोंभी येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री भैरवनाथ महाराज यात्रेचे आयोजन दि.९ मार्च रोजी करण्यात आले असून भगत स्व. जगन्नाथ कोळी यांच्या आशीर्वादाने भगत विजय कोळी हे बारा गाड्या ओढणार आहेत त्यांना बगले राजेंद्र कोळी व जितेंद्र कोळी हे सहकारी राहतात. यात्रेत मिठाई , खेळणी अशी अनेक दुकाने येतात तसेच यात्रेनिमित्त गावातील सर्व नागरीक एकत्र येऊन आनंद घेत असतात.या यात्रेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ पाहायला मिळत नाही तसेच सर्व तरुण एकत्र येऊन वर्षातून एकदा येणारा यात्रेच्या दिवसाचा आनंद घेतात. यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या करमणूकीसाठी सुकलाल बोराडीकर यांच्या तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील व यात्रेला येणाऱ्या नागरिकांनी शांततेत यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन पोलीस पाटील सौ.वैशाली प्रमोद पाटील व सरपंच सौ.काजल भोजराज कोळी यांनी केले असून गावातील सर्व पदाधिकारी व तरुण मंडळ सहकार्य करीत आहे. यात्रेत भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पानाचे औट पोष्टचे पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.











