जळगाव -: कांचन नगरातील जागृत गुरुदत्त मंदिर तर्फे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेला राधा व कृष्णा यांच्या विवाहाचा देखावा किरण सोनवणे सीमा सोनवणे यांनी सादर केला व विवाह संपन्न झाला विवाहप्रसंगी प्रत्यक्ष नृत्य केले व आनंदी व वातावरण निर्माण झाले होते काहींनी अहिराचे पैसे वाजविले त्या प्रसंगी कथाचे निरूपण ह.भ.प मनोहर महाराज खोंडे करीत आहेत तसेच दिनांक ६/१२/२०२२ रोजी श्रीमद् भागवत कथेची कांचन नगरात संध्याकाळी ४ ते ७ शोभायात्रा काढण्यात आली व त्याच दिवशी रात्री ८.३० ते ११ वाजता ह.भ.प कुशाल महाराज म्हाळसा पिंपळगाव यांचे जाहीर कीर्तन होईल अशी माहिती विश्वस्त राजेंद्र कोळी यांनी दिली.
https://youtu.be/-auNSclvrWU










