किनगावमध्ये माथेफिरू तरुणाचा तीन जणांवर चाकूहल्ला. यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

0
14

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

यावल – : तालुक्यातील किनगाव गावात एका तरूणाने तीन जणांवर चाकुहल्ला केला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असुन, रात्री उशीरापर्यंत चाकुहल्ला करणाऱ्या तरुणाविरूद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

किनगाव येथे दि. १५ जुनच्या रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गावातील फॉरेस्ट जवळ उभे असतांना गावात राहणाऱ्या शाह नामक तरूणाने तौसीफ समिर तडवी (वय १९), शरीफ लुकमान तडवी (वय १९) आणि सद्दाम नवाज तडवी (वय २०) या तिघांवर शस्त्राने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

तिघे जखमींना उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. अमीत तडवी व त्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रथम उपचार केले असून यातील दोन जणांना पुढील उपचारासाठी जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या संदर्भात यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे, पोलीस नाईक राजेंद्र पवार यांनी या घटनेतील जखमींची माहिती घेतली असुन, हल्ला करणाऱ्या तरूणाविरुद्ध रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान हल्ला करणारा तरूण मात्र फरार असल्याचे वृत्त आहे. हल्ला करण्याचे कारण अद्याप समजू शकलू नाही.

Spread the love