चोपडा – ग्रामपंचायतीतील तथाकथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून तारीख पे तारीख चौकश्या लांबणीवर पडत असल्याने गावकऱ्यांच्या संभ्रम दाट गडद होत चालला आहे. न्याय न मिळाल्यास वेळच ठरवेल काय होईल ते होईल असा टाहो आदिवासी जनतेच्या तोंडून फुटत असल्याची वार्ता जरी असली तरी प्रशासकिय अधिकाऱ्यांकडून न्यायाच्या प्रतीक्षेत गावकरी आहेत.
गावातील वातावरण आज जरी शांत असले तरी चौकशी संभ्रमाच्या भोवऱ्यात अडकली असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मेलाने ग्रा. पं. येथील ग्रामसेवक यांच्या वर माहितीच्या अधिकार टाकला असून मा. गटविकास अधिकारी यांनी चौकशीसाठी. 11-11-2021 रोजी प्रशासक मोरे साहेबांना यांना पाठवले असता एक दिवस चौकशी झाली असून चौकशी व्यवस्थित झाली नसून पुढची तारीख . ढकलण्यात आली आणि अजून पर्यंत दुसरी चौकशी झाली नाही. या वरून असे दि येते की मा. गटविकास अधिकारी हे ग्रामसेवक व ठेकेदार यांना वाचवण्याचे प्रयत्न करीत आहेत. व गटविकास अधिकारी साहेबांचं ग्रामसेवक सोबत साटेलोटे असल्याची दाट शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे जर पुढील चौकशी लवकर झाली नाही तर समस्त गावकरी पंचायत समितीसमोर चोपडा येथे उपोषणाला बसणार आहेत असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.याप्रकरणी प्रताप काथ्या बारेला व गावकऱ्यांनी १४ वित्त आयोगाच्या निधीत अपहार झाल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी एका पत्रकान्वये केली आहे.