सुनसगाव येथे मेरी माटी मेरा देश कार्यक्रमात माजी सैनिकांचा सन्मान !
सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथे नुकताच ‘ मेरी माटी मेरा देश ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आ.संजयभाऊ सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी लावण्यात आलेल्या शिलालेखाचे पूजन माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी प्रथम गावातील रहिवाशी माजी सैनिक भास्कर पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर गावातील स्वातंत्र्य सैनिक यांच्या वारसांचा आणि माजी सैनिक तसेच विद्यमान सैनिक आणि पोलीस कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला . त्यानंतर आ संजयभाऊ सावकारे व माजी सैनिक तसेच पदाधिकारी व शिक्षकवृंद , अंगणवाडी सेविका , मदतनीस , उपकेंद्राचे सी एच ओ , आरोग्य कर्मचारी , आशा सेविका , बचत गटाच्या सीआरपी , ग्रामसंघाच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले . प्रास्तविक भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले . राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत जि प मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सादर केले. स्वातंत्र्य सैनिकांच्या व माजी सैनिकांच्या देश सेवे बाबत माहिती देण्यात आली . यावेळी गावातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरीक उपस्थित होते.