आमदार लता सोनवणे यांनी केला आपल्या निवासस्थानी कर्तव्यावर असलेल्या साहित्यिक पोलीस विनोद अहिरे यांचा सत्कार

0
20

जळगाव – चोपडा मतदारसंघाचे आमदार लता सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या निवासस्थानी गार्ड ड्युटीवर कर्तव्यावर असलेले साहित्यिक पोलीस विनोद अहिरे यांचा शॉल, बुके देऊन सत्कार केला. सदर प्रसंगी यावल कृषी उत्पन्न समितीचे संचालक सूर्यभान पाटील तसेच महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे सदस्य विकास पाटील यासह आदी मान्यवर उपस्थित होते

जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद अहिरे यांचे नुकतेच ‘काळजातील पोलीस महासंचालक’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तकाला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यानच्या काळात अहिरे यांची चोपडा मतदारसंघाचे आमदार लता सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी गार्ड ड्युटी लागली असता अहिरे यांनी स्वलिखित आपले ‘मृत्यू घराचा पहारा’ आणि हुंकार वेदनेचा’ हे पुस्तक भेट दिली. अहिरे यांची वाचनाची व लिखाणाची आवड बघून सोनवणे यांनी त्यांना आपले अँटी चेंबर बसण्यासाठी उपलब्ध करून दिले‌‌. काळजातील पोलीस महासंचालक या पुस्तकाचे 80 टक्के लेखन याच अँटी चेंबरमध्ये झालेले आहे, असा उल्लेख अहिरे यांनी आपल्या पुस्तकांमधील मनोगतात उल्लेख केलेला आहे. सदरची बाब लक्षात आल्यावर अहिरे यांचा लता सोनवणे आणि चंद्रकांत सोनवणे यांनी सत्कार करून पुढील साहित्य प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the love