मनसे व संतप्त नागरिकांची नगरपालिकेत धडक मध्यरात्री सोडले जाणाऱ्या पाणीची वेळे बदला

0
47

यावल प्रतिनिधी  –  शहरात नगर पारिषदेकडून मध्यरात्री तीन वाजेला होणारा सार्वजनिक पाणी पुरवठ्याची वेळ बदलवा या मागणीसाठी दुपारी संतप्त नागरिकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत धडक दिली व अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला यापूर्वीदेखील मनसेकडून निवेदन देण्यात आले होते त्यावर काय कार्यवाही झाली असा संतप्त महिला व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे दादू धोत्रे,अभियंता एस.ए.शेख यांना विचारला नगरपालिकेत बारा वाजेपासून प्रचंड मोठ्या प्रमाणावर संतप्त नागरिकांनी अधिकारी कर्मचार्‍यांना वेठीस धरले. नगरपालिकेने उत्तर द्यावे अन्यथा नागरीक न्यायालयात धाव घेतील असा इशारा देण्यात आला आहे. नगरपालिकेत आंदोलक महिला व नागरिकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर घारू, तालुका अध्यक्ष जुगल पाटील, शहराध्यक्ष आकाश चोपडे, तालुका उपाध्यक्ष गणेश येवले, शहर उपाध्यक्ष दुर्गेश कोळी, विद्यार्थी सेनाध्यक्ष विपुल येवले, काऊ घारू, गणेश येवले, तुषार गजरे, कुणाल गजरे, भावेश तायडे, सावंत जाधव, जयेश सुरवाडे, महेश घारू, जतीन घारू सह आदींची उपस्थिती होती

Spread the love