जळगाव -गेल्या महिन्या भरापासून जळगाव शहरात मोबाईल स्नॅचींग, घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यात वाढ होत असल्याने मा.पोलीस अधीक्षक डॉ. श्री प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तपासा बाबत आदेश दिले. त्यावरून मा. किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी त्यांचे स्वतंत्र पथक तयार करुन त्यात सपोनि श्री जालीदर पळे, सफो युनुस शेख, अशोक महाजन, पोह सुनिल दामोदरे, पोह विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, संदीप सावळे, पोना अविनाश देवरे, रविंद्र पाटील, दिपक शिंदे, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील चालक सफी राजेंद्र पवार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांची पथक नेमण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडील वरील पथक हे शहरात फिरुन गुप्तबातमीदारा मार्फत माहिती काढत असतांना मा. पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, युसुफ शेख उर्फ चिल्या रा. शिवाजी नगर हुडको जळगाव व त्याचे साथीदार यांनी जळगाव शहरात मोबाईल स्नॅचींगचे गुन्हे केल्याची बातमी मिळाली असून ते शिवाजी नगर भागात राहतात. त्यावरून मा.पोलीस निरीक्षक, किरणकुमार बकाले यांनी सदर पथकास आदेश दिल्याने सदरचे पथकाने शिवाजी नगर भागात फिरून नमुद आरोपीताची माहिती काढुन आरोपी नामे युसुफ शेख उर्फ चिल्या इसा शेख यास ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी आरोपी नामे युसुफ शेख उर्फ चिल्या इसा शेख याने व त्याचे ३ साथीदार अल्पवयीन बालक यांनी मिळून गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपी नामे युसुफ शेख उर्फ चिल्या इसा शेख याचे कडून १) जिल्हापेठ पो.स्टे. CCTNS NO २०२/२०२२ भादवि कलम ३९२,३४, २) चोपडा शहर पो.स्टे. CCTNS NO ७७/२०२२ भादवि कलम ३७९, ३) जळगाव शहर पो.स्टे. CCTNS NO ५२/२०२२ भादवि कलम ३८०,४५७, ४) जिल्हापेठ पो.स्टे. CCTNS NO २००/ २०२२ भादवि कलम ३९२.३४, ५) जळगाव शहर पो.स्टे. CCTNS NO ५३ / २०२२ भादवि कलम ४५७,३८०, ६) जळगाव शहर पो.स्टे. CCTNS NO ४३/२०२२ भादवि कलम ३७९, ७) शनिपेठ पो.स्टे. CCTNS NO ३६/२०२२ भादवि कलम ३७९ असे मोबाईल स्नॅचिंगचे २, घरफोडीचे २. मोटार सायकलचे ३ असे एकुण ७ गुन्हे उघडकीस आणुन त्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि श्री जालींदर पळे नेम, स्थागुशा जळगाव हे करीत आहेत.