एसटी चालक मारहाण प्रकरणी सर्वच आरोपींना अटक करा;- एसटी कर्मचारी समन्वय कृती समितीचा अंदोलनाचा इशारा 

0
193

जळगाव – जळगाव नांदेड फेरी पूर्ण करीत असताना बस चालक श्री तुकाराम आनंदा रायसिंग यांना नांदेड गावाचे रहिवासी महेंद्र पाटील, वैशाली पाटील, तेजस पाटील व नम्रता पाटील यांनी मारहाण केली असल्याचा आरोप बस चालकाने केलेला आहे. मारहाण झाल्यानंतर बस चालकास गंभीर अवस्थेत धरणगाव येथील दवाखान्यात हलवण्यात आले त्याचा नंतर पुढील उपचारासाठी शासकीय महाविद्यालय जळगाव येथे हलविण्यात आले होते. या संदर्भात रात्री उशिरा गुन्हा नोंद झालेला होता. या संपूर्ण प्रकरणी पोलीस तपास अधिकारी करीम सय्यद यांच्याकडून संथगतीने तपास होत असल्यामुळे व पूर्ण चारही आरोपींना अटक होत नसल्यामुळे सर्व संघटनांच्या कर्मचारी समन्वय कृती समितीमार्फत पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हा शाखा व विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे किसन नजनपाटील यांनी संघटना पदाधिकाऱ्यांशी वार्तालाप केला व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी संदर्भित प्रकरणात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कारवाई न केल्यास संघटनात्मक आंदोलन केले जाईल असा इशारा याप्रसंगी देण्यात आला.

एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव श्री आर के पाटील, एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेचे विभागीय सचिव श्री नरेंद्र सिंग राजपूत, मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे श्री सोपान सपकाळे, एसटी कष्टकरी जनसंघाचे वि. सचिव श्री मनोज सोनवणे, कास्ट्राइब संघटनेचे श्री शैलेश नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने विविध अधिकाऱ्यांशी बोलणी केली. या बैठकीमध्ये सूत्रसंचालन श्री गोपाळ पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती यशोदा पांढरे यांनी केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love