दोन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्धतेची कारवाई

0
54

जळगाव – शहरातील समता नगर येथील विश्वास अरुण गारुंगे तसेच पारोळा येथील पारोळा पोलिस स्टेशन हद्दीतील समाधान लोटन चौधरी या दोघं गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील समता नगर भागात राहणारा विश्वास अरुण गारुंगे याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला एकूण अठरा गुन्हे दाखल आहेत. याशिवाय त्याच्याविरुद्ध चारवेळा प्रतिबंधात्मक कारवाया देखील झाल्या आहेत. पो.नि. शिल्पा पाटील व त्यांच्या सहका-यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता. विश्वास गारुंगे याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पारोळा येथील राजीव गांधी नगर भागातील गुन्हेगार समाधान चौधरी याच्याविरुद्ध चौदा गुन्हे दाखल आहेत. याशिवाय त्याच्याविरुद्ध एक अदखलपात्र गुन्हा दाखल असून दोनवेळा प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. त्याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या पो.नि. शिल्पा पाटील आणि पारोळा पोलिस स्टेशनचे पो.नि. सुनील पवार यांनी अनुक्रमे दोघा गुन्हेगारांविरुद्ध आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार केला होता. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

Spread the love