मुलांना उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवा परंतु त्यांना नेहमी आपल्या परस्थितीची जाणिव करुन द्या… पो.नि. देविदास कुनकगर

0
36

हेमकांत गायकवाड

 

चोपडा -कै.दगाजिराव बोरसे शैक्षणिक सांस्कृतिक ग्रामीण क्रीडा मंडळ वेळोेदे व तरुण मित्र मंडळ यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी, नामवंताचे सत्काराचा कार्यक्रम……गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ,नामवंत व्यक्तीचा सत्कार आयोजित करण्यात आला आणि त्या कार्यक्रमाचे मला प्रमुख पाहुणे म्हणुन संधी मिळाली. पोळाचा सण असुन देखिल असा कार्यक्रम होणे म्हणजे आदर्श गावाचे लक्षण होय. येथे जी ज्येष्ठ मंडळी बसली आहे त्याचा कडून अनुभवाची शिदोरी नवीन पिढीने घ्यायला हवी. गावातील इतर भानगडीत न पडता तुरून मंडळीनी शिक्षणावर भर द्यायला हवा. प्रत्येक पाल्यानी आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी शहराकडे पाठवायला हवे. परंतु वडिलांनी आपल्या पाल्याला परिस्थितीची जाणिव करुन दया. मागेल त्या वेळेस त्याला पैसे पाठवू नका त्यालाही पैशाची किंमत कळु दया. असे मौलिक प्रतिपादन चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देविदास कुनकर यांनी कै.दगाजिराव बोरसे शैक्षणिक सांस्कृतिक ग्रामीण क्रीडा मंडळ वेळोेदे व तरुण मित्र मंडळ यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी, नामवंताचे सत्काराचा कार्यक्रम राम मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते यात प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरवात माण्यवराचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमला पूजन व माल्यार्पन करण्यात आले. यावेळी व्यापीठावर कार्यक्रमांचे अध्यक्ष ग्रामंचायत सदस्य अरुण बाजीराव बोरसे, तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षक खंडेराव रामभाऊ सोनवणे, देविदास सोनवणे, बाबुराव बोरसे तसेच सत्कारमुर्ती भरवस शाळेचे शिक्षक राजेंद्र सोनवणे, निवृत्त तालुका कृषी सहा्यक अधिकारी यशवंत बोरसे, आदर्श शिक्षक दत्तात्रय नेरपगारे, पत्रकार व तंटामुक्ती सदस्य लतिष जैन आदी मान्यवर उस्थितीत होते. मान्यवराचे सत्कार संस्थेच्या सदस्यांनी केले.

कार्यक्रमात गावाच्या वतीने तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण प्रल्हाद सोनवणे उपाध्यक्ष जयेश चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण सोनवणे यांनी आपल्या मनोगतात सागितले की, तंटामुक्ती जबादारी जरी आमच्या टाकली आहे तरी गावकऱ्यांनी सहकार्य केले तरच आपण तंटामुक्तीचे पारितोषिक मिळवू शकतो आणि ते आपल्या मिळवायचाच आहे असे सर्वांनी मनाशी चंग बांधून घ्या असे सोनवणेनी सागितले. तसेच मंडळा तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात अनुष्का बोरसे, अश्विनी चौधरी, भावेश सोनवणे, शुभांगी पारधी, अभिजित मोरे, मानशी चौधरी, शितल जयस्वाल, सृष्टी बोरसे, भाग्यश्री बोरसे,प्राची बोरसे, कल्याणी सोनवणे, यश भालेराव, विश्वेस जयस्वाल, प्रसाद नेरपागारे तसेच राजेंद्र सोनवणे, लतिष जैन,

यशवंत बोरसे, दत्तात्रय नेरपगारे आदींचा सत्कार करण्यात आला. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात खंडेराव सोनवणे यांनी आपले विचार मांडतना सागितले कै.दगाजिराव बोरसे शैक्षणिक सांस्कृतिक ग्रामीण क्रीडा मंडळ वेळोेदे हे मंडळ मागील २८ वर्षा पासुन कार्यरत आहे. नव नवीन उपक्रम राबवत असते.पोळा सणाच्या दिवशी हा सुत्य उपक्रम राबविण्याल्याने वेगळा आनंद होत आहे. तरुण पिढी नव नविन व विधायक उपक्रम राबवत जा आम्ही ज्येष्ठ मंडळी आपल्या सोबत आहोत. अशी ग्वाही सोनवणे यांनी दिले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत बोरसे, तर प्रास्तविक संजय नारायण बोरसे यांनी केले तर उपस्थितामध्ये सुभाष सैदाणे, विठ्ल चौधरी, नितीन सोनवणे, शरद चौधरी,चंदुलाल जयस्वाल, प्रकाश चौधरी, पुरुषो्तम सोनवणे, गोकुळ सोनवणे, जगणं कोळी, बन्सीलाल पारधी, चंद्रकांत मोरे, अमोल सोनवणे, मनोज बोरसे, भिकन सोनवणे, सजय सैदाणे, सतिश बोरसे, शरद बोरसे हिम्मतराव नेरपगारे, ईश्वर पाटील,सागर कोळी, अशोक चौधरी,गुलाबराव बागुल,मांगिलाल बोरसे, अनिल सोनवणे,आदी गावातील मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवटी अगणवाडी कर्मचाऱ्यांनी आशा वर्कर्स यांनी पोषण आहार बाबत आलेल्या माताबघिणाना व तरुण मंडळीना मार्गदर्शन केले.

Spread the love