‘मुंबईत मला गोळ्या घाला, मी बलिदान द्यायला तयार’; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

0
30

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानमध्ये उपोषणाला बसणार आहेत. आज अंतरवाली सराटी येथून ते मुंबईच्या दिशेनं कूच करतील. आज सकाळी १० वाजता मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटी येथून निघतील. नंतर निश्चित केलेल्या मार्गातून २९ तारखेला आझाद मैदानमध्ये पोहोचतील.

निघण्यापूर्वी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. संबोधित करताना त्यांनी आंदोलकांना आवाहन केलं. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट आरोप करत इशारा दिला.

लातूरमध्ये काल एका तरूणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘काल एका तरूणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ते करू नका. मराठ्यांना तुम्ही आडवले. गॅझेट असूनही देत नाही. मराठी आणि कुणबी एक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांचा सयंम ढासळू देऊ नका’, असं जरांगे पाटील म्हणाले.

‘मराठा आरक्षणासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे. मुंबईमध्ये आल्यावर मला गोळ्या झाड्या. आमच्या शेकडो आत्महत्या तुमच्यामुळे झाल्या आहेत. याला तुम्ही जबाबदार आहात’, असा थेट आरोप जरांगे पाटील यांनी फडणवीस यांनी केला आहे. ‘आजपासून कुणीही आत्महत्येचा प्रयत्न करायचा नाही. आपण डाव टाकून आरक्षण मिळवायचा आहे’, असंही पाटील म्हणाले.

Spread the love