मुंबई -: मुंबई आपलीच आहे, फिरून घ्या,’ असे म्हणत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांनी रविवारचे औचित्य साधत मुंबई पर्यटन केले. रविवारी आझाद मैदानावर गर्दी कमी होती.
पण, शहरातील चौपाट्या, नरिमन पाईंट, मरीन ड्राइव्ह, जुहू येथील इस्कॉन मंदिर, हाजी आली दर्गा, महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, गेटवे ऑफ इंडिया आदी ठिकाणांवर आंदोलकांचे जथ्थे दिसून आले. हलकी आणि झांज वाजवत, नाचत आंदोलकांनी मुंबई पाहण्याचा आनंद लुटला.
गत तीन दिवसांपासून आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. शुक्रवार आणि शनिवारी पाऊस असल्यामुळे आंदोलकांनी मैदान, सीएसटी आणि मुंबई महापालिकेसमोरील चौकात ठिय्या मारला होता. रविवारी पावसाने उघडीप दिली होती. तसेच मैदानावर फारशा सुविधा नसल्यामुळे सर्वजण आझाद मैदानावर थांबू नका. गाड्या पार्किंग केलेल्या ठिकाणी जा. मुंबई फिरून पहा, असे खुद्द जरांगे यांनीच सांगितल्यामुळे आंदोलकांनी रविवारचे औचित्य साधत मुंबई पर्यटन केले.
रविवारी आझाद मैदानावर गर्दी नव्हती. आंदोलकांनी शहरातील चौपाट्या, नरिमन पाईंट, मरीन ड्राइव्ह, जुहू येथील इस्कॉन मंदिर, हाजी आली दर्गा, महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, गेटवे ऑफ इंडिया आदी ठिकाणांवर आंदोलकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. हलकी आणि झांज वाजवत, नाचत आंदोलकांनी मुंबई पाहण्याचा आनंद लुटला.