जळगाव -जळगाव ममुराबाद रस्त्यावरील उस्मानिया पार्क ते माळसादेवी दरम्यानच्या महामार्गावरील रस्त्याच्या कडेला म न चा जळगाव यांनी शहरातील वेस्टेज मटेरियल कचरा मातीचे ढिगारे टाकल्याने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट कारभाराने केलेल्या महामार्गाच्या रस्त्यास, ठिक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गेल्या महिन्यापासून अनेक वाहनचालकांचे अपघात झालेले आहेत. याबाबत जळगाव म न पा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे .
यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे . तरी संबंधितांनी त्वरित लक्ष घालून महामार्ग त्वरित दुरुस्त करावा जळगाव मनपा ने महामार्गावरील रस्त्याच्याकडेला टाकलेले घाणीचे ढिगारे दुसरीकडे टाकण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे .