मोठी बातमी! रोहित पवार भाजपात येणार होते, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

0
37

नितेश राणे हे भाजपा पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. ते नेहमीच हिंदुत्त्वाचा पुरस्कार करताना दिसतात. वेळोवेळी त्यांनी केलेल्या विधांनामुळं त्यांची नेहमीच चर्चा असते. कोकणात त्यांचे मोठे राजकीय प्रस्थ आहे.

दरम्यान, त्यांनी आता एक मोठा आणि खळबळजन दावा केला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेते रोहित पवार हे 2019 सालीच भाजपात येणार होते, असा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे.

आमदार रोहित पवार हे 2019 सालीच भाजपात येणार होते, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. रोहित पवार हे मनाने भाजपात आहेत तर शरीराने शरद पवार यांच्यासोबत आहेत, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार हे 2019 सालीच भाजपात येणार होते. ते कुठल्या वेळी कोणत्या भाजपाच्या नेत्यांना भेटात हे आम्ही बोलायला लागलो तर रोहित पवार यांनात तोंड वाचवायला जागा राहणार नाही. रोहित पवार हे मनाने भाजपात आहेत. शरीराने शरद पवार यांच्या पक्षात आहेत, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे.

रोहित पवारांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी

दरम्यान, रोहित पवार हे शरद पवार यांच्या पक्षातील तरुण आणि तडफदार नेते मानले जातात. भाजपा तसेच सत्ताधाऱ्यांवर त्यांनी वेळोवेळी टीकेचे आसूड ओढलेले आहेत. रोजगार, शिक्षण, शेती आदी क्षेत्रांतील प्रश्नांना घेऊन ते सरकारला घेरताना दिसतात. त्यांना नुकतेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. शशिकांत शिंदे यांची प्रदेशध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर रोहित पवार यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची आणि पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेलच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली.

Spread the love