रावेर प्रतिनिधी–राजेंद्र महाले—रावेर येथून जवळच ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात पदार्थ विज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा.डॉ.के.जी कोल्हे यांची जळगाव जिल्हा एन मुक्टो संघटनेच्या अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याचा आढावा घेत, त्यांची काम करण्याची पध्दत बघून संघटनेने एक मताने त्यांची बिनविरोध निवड केली. या निवडी बद्दल ऐनपूर सह जिल्हाभरातील एन.मुक्टोच्या सदस्यांन सह पदाधिकाऱ्यांनी व प्राध्यापक, प्राध्यापेकेतर कर्मचारी व आप्तेष्ट गणांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी ऐनपूर महाविद्यालयाचे एन मुक्टोचे सदस्य व मराठी विभागाचे प्राध्यापक एम.के.सोनवणे व वनस्पती विभागाचे प्राध्यापक डॉ. एस.ए.पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Home जळगाव जिल्हा एन मुक्टोच्या अध्यक्ष पदी ऐनपूर महाविद्यालयाचे प्रा.डॉ.के.जी कोल्हे यांची एकमताने निवड.












