बरबडा : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ध्येय एज्युकेशन फाउंडेशन (पाचगणी, जि. सातारा) यांच्या वतीने जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा ता.नायगाव जि.नांदेड येथील सहशिक्षक नागोराव मारोती तिप्पलवाड यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुदाम शेंडगे यांनी यांच्या नावाची घोषणा केली.
श्री तिप्पलवाड यांनी मागील तेहतीस वर्षात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन, विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा आणि शैक्षणिक सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे आणि मागील दोन वर्षापासून आय एम विनर “I Am Winner Exam” सारख्या राज्यस्तरीय परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती आणि आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आणि या स्पर्धा परीक्षेत विद्यार्थांनी अतिशय सुंदर गुण प्राप्त करत तालुका जिल्हा व राज्यस्तरापर्यंत पोहोचले म्हणूनच हा सन्मान त्यांना मिळाला आहे.त्यांनी करत असलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. २९) पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास आ. राहुल कुल, आ. उमाताई खापरे, आ. अमित गोरखे, आ. अरुण लाड, शिक्षण संचालक महेश पालकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
त्यांच्या या पुरस्कार निवडीबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी,संचालक व्हि टी सुरेवाड,शिवाजीराव धर्माधिकारी, जगदीशराव धर्माधिकारी, इरंना कंडापल्ले, छायाताई धर्माधिकारी, मुख्याध्यापक सुदर्शनराव धर्माधिकारी, उपमुख्याध्यापक बडूरे जी पी पर्यवेक्षक फड एस एन, तगडपल्लेवार सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पत्रकार मंडळी,गावातील प्रतिष्ठित नागरिक आजी माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.









