नागपूर हिंसाचाराचा मास्टरमांइड फहीम खान गजाआड, कोर्टाने 21 मार्चपर्यंत सुनावली पोलिस कोठडी

0
40

नागपूर -: हिंसाचार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. हिंसाचार प्रकरणातील मास्टरमांइडच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आले आहे. फहीम शमीम खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले, जिथे त्याला 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्यासोबत अटक केलेल्या 51 जणांनाही पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दावा केला की, 40 वर्षीय फहीमने दंगल भडकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, फहीमने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

फहीमने भडकाऊ भाषण दिले

मिळालेल्या माहितीनुसार, फहीमने भडकाऊ भाषण देऊन लोकांना भडकावले. यानंतरच हिंसाचाराला सुरुवात झाली. फहीम हा नागपूरच्या  संजय बाग कॉलनीतील यशोधरा येथील रहिवासी आहे. त्याचे नाव यापूर्वीही अनेक वादात समोर आले आहे. मात्र निवडणूक लढवून तो राजकारणात सक्रिय झाला.

पोलिस एनएसए लागू करण्याच्या तयारीत

दरम्यान, हिंसाचार भडकावल्याप्रकरणी नागपूर पोलिस फहीमविरुद्ध एनएसए अंतर्गत कारवाई करु शकते. त्याच्या नेटवर्कचा (JSN)  पर्दाफाश करण्यासाठी पोलिस सध्या त्याचे कॉल डिटेल्स आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीज तपासत आहेत.

हिंसाचाराची पूर्वनियोजित योजना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर हिंसाचाराची पूर्वनियोजित योजना होती. फहीमने काही लोकांना एकत्र करुन नियोजित दंगल घडवून आणली. रिपोर्टनुसार, हिंसाचाराच्या एक दिवस आधी, दंगलखोर लोकांनी गणेशपेठ पोलिस ठाण्याबाहेर जमून ‘औरंगजेब जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. जमावाला भडकवण्यात फहीमचा मोठा वाटा आहे. सोमवारी (17 मार्च) रात्री मध्य नागपूरमधील चिटणीस पार्क परिसरात हिंसाचार उसळला. यावेळी दंगलखोरांनी पोलिसांवर  दगडफेक केली, ज्यामध्ये 34 पोलिस जखमी झाले.

 

Spread the love