नाल्यात पाय घसरून पडलेल्या १४ वर्षीय मुलीचा मृत्यु .

0
13

जळगाव-येथील हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलगी नाल्याजवळ उभी असताना पाय घसरून पडल्याने ती वाहून गेल्याची घटना आज दुपारी घडली असून त्या मुलीची ओळख पटली आहे.

गायत्री सुरेश मिस्तरी (वय-१४ ) रा. कोळन्हावी ता. यावल ह.मु.हरीविठ्ठल नगर जळगाव असे मयत मुलीचे नाव आहे. , गायत्री मिस्तरी ही अल्पवयीन मुलगी वडील सुरेश शामराव मिस्तरी आणि आई सिमाबाई मिस्तरी यांच्यासह लहान बहिण सोनू सोबत राहते. आज बुधवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी वडील सुरेश मिस्तरी हे अयोध्या नगरात कामावर निघून गेले. आई सिमाबाई घरात होत्या. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गायत्री हि कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्या. गायत्रीच्या पश्चात आई वडील, मनिषा, माधुरी, सरला, दुर्गा आणि सोनू अश्या पाच बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

Spread the love