वाल्मिक कराड हा माफीया आहे. मस्साजोग प्रकरणात सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील सत्य परिस्थिती सांगितली होती. पण मुख्यमंत्र्यांनी टाईमपास केला. माफीयाला ताकद देण्याचे काम केले.
त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळातून बाहेर काढून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
नाना पटोले हे सोमवारी नांदेड विमानतळावर आले होते. यावेळी पटोले म्हणाले, अजित पवारांवर ज्यावेळी आरोप झाले. त्यावेळी त्यांनाही मंत्री मंडळातून बाहेर काढण्यात आले होते. आता मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्री मंडळातून बाहेर काढून चौकशी केल्यास मयत संतोष देशमुखांना न्याय मिळेल. असे पटोले म्हणाले. तसेच छगन भूजबळ हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाऊ शकतात. त्यावर मी काय बोलणार? त्यांच्या नाराजीबद्दल मला माहिती नाही. मंत्री पदाचे वाटप झाल्यानंतर आता पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच आहे. कारण हे लोकातून निवडून आलेले सरकार नाही. निवडणुक आयोग आणि भाजपाच्या सिंडीकेट मधून आलेले सरकार आहे. त्यामुळे लोकांना त्यांना काही देणे-घेणे नाही. लोकांना कसे लुटता येईल, मलाईदार खाते, मालदार जिल्हे कसे मिळतील यावर सगळा जोर सुरु आहे.