नशिराबाद – गोजोरा रस्त्यावर रानडुकर व निलगायच्या धडकेत अपघात दोन जखमी.

0
57

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील राज्य मार्ग क्रमांक २७० वर दोन ठिकाणी वन्यप्राण्यांच्या धडकेत अपघात होऊन दोन तीन वाहन चालक जखमी झाले तर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून निलगायीचे कंबर मोडले आहे ह्या दोन्ही घटना दि.२१ रोजी सकाळी ११ व १२ वाजेच्या सुमारास घडल्या आहेत.

या बाबत सविस्तर माहिती अशी की दि.२१ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आनंदा नथु सपकाळे रा. सुनसगाव हे आपली मालकीची रिक्षा क्र. एम एच १९ – ३७१९ ही घेऊन (JSN) नशिराबाद कडे जात होते तर त्याच वेळी नशिराबाद गावाकडून कोलते नामक मोटरसायकल स्वार होंडा एम एच १९ बी एच ३३५७ ही घेऊन सुनसगावाकडे येत होते मात्र नशिराबाद – सुनसगाव दरम्यान प्रदिप रोटे यांच्या शेताजवळ अचानक दोन रानडुक्कर वेगाने रस्ता ओलांडत असताना रिक्षा व मोटरसायकल ला धडकले त्यामुळे रिक्षा चालक आनंदा सपकाळे व मोटरसायकल स्वार जखमी झाले असून रिक्षा व मोटरसायकल चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जखमींना सुनसगाव नशिराबाद व रस्त्यावरील वाहनधारकांनी मदत करीत जळगाव येथे दवाखाण्यात भरती केले आहे.

दुसऱ्या घटनेत दुपारी १२ वाजेच्या सुमारास याच रस्त्यावर सुनसगाव – गोजोरा दरम्यान निळकंठ भोळे यांच्या शेताजवळ गोजोरा गावाकडून येणाऱ्या कार ला रस्ता ओलाडतांना निलगाय / लोधडे ( नर ) धडकले ही धडक एवढी भयानक होती की कार च्या पुढील काचाचा चेंदामेंदा होऊन काच पडला होता तर निलगाय लोधडे रस्त्याच्या चारीत फेकले गेले होते. या घटनेत लोधडे गंभीर जखमी झाले आहे कार च्या धडकेने कंबर तुटले असावे असे सांगण्यात आले होते तर लोधड्याच्या डोक्यातून तसेच पाठ व पोटातून रक्तस्राव सुरु होता. तर कार चालक जखमी अवस्थेत आपले वाहन घेऊन गेल्याचे समजते .या बाबत माहिती मिळताच वनविभाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटना स्थळी धाव घेतली .जखमी नर जातीच्या निलगायीवर वैदकिय उपचार करुन जंगलात सोडणार असल्याचे वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सांगीतले आहे.

या परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर फलक लावल्यास अशा घटना पासून आळा बसू शकतो अशी चर्चा यावेळी सुरु होती.सुनसगाव परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची संख्या असून वाहन धडकण्याच्या अनेकदा घटना घडतात त्यामुळे अनेक वाहनधारक जखमी झाले आहेत. मात्र या रस्त्यावर वन्यप्राणी असल्याचा कुठेही फलक नाही त्यामुळे वनविभागाने या रस्त्यावर ठिकठिकाणी ‘ वन्यप्राण्या पासून सावधान ‘ असे फलक लावल्यास वाहनधारक वाहन चालवताना सावधगीरी बाळगतील असे सांगण्यात येत आहे.

Spread the love