नशिराबाद नगरपरिषद निवडणूकीत तीन जागा बिनविरोध होण्याची शक्यता ?

0
28

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे 

भुसावळ -:  येथून जवळच असलेल्या नशिराबाद येथील नगरपरिषद निवडणूक केव्हा लागते याकडे सर्व नागरीकांचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे या नशिराबाद गावात हिंदू – मुस्लिम एकता असल्याने कदाचीत नगराध्यक्ष पदासाठी एकास एक किंवा हिंदू मुस्लिम मध्ये एक नगराध्यक्ष तर दुसरा उप नगराध्यक्ष असे होईल असे वाटत असताना १५ पैकी १० अर्ज वैध ठरले आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील एकच अर्ज आहे त्यामुळे आता माघार कोण घेणार याकडे लक्ष वेधले जाते आहे.

राहीले नगरसेवक पदासाठी ११४ अर्ज आहेत.आता जर ठरवले तर काही प्रभागात अपक्ष उमेदवार आहेत तर काही भागात पक्षाने आपले उमेदवार दिले आहेत. म्हणून स्थानिक नागरीकांना वाटते आहे की किमान दोन – तीन जागा बिनविरोध होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक पाहता या निवडणूकीत नवखे चेहरे असून त्यांच्या घराण्यातील आई – वडील यांनी त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य पद उपभोगले आहे तर काही नगरपरिषद होण्या अगोदरच्या ग्रामपंचायत सदस्य होते .त्यामुळे नविनच आणि नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक होणार असल्याने निवडूण येणाऱ्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यावर नशिराबाद नगरपरिषद चे प्रथम नगराध्यक्ष व प्रथम नगरसेवक ही मोहर लागणार असल्याने जो तो प्रयत्न करत असून काही जागा बिनविरोध तर काही ठिकाणी एकास एक काट्याची लढत असून आपले राजकिय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पैशांची उलाढाल होतांना दिसणार असल्याची चर्चा नशिराबाद पंचक्रोशीत सुरु आहे.

Spread the love