नशिराबाद पोलीस पथकाचे उपविभागीय पोलीस अधीक्षकांनी केला सन्मान !

0
11

प्रतिनिधी-  जितेंद्र काटे

भुसावळ – नशिराबाद पोलीस स्टेशन मध्ये दि.१० डिसेंबर २०२४ रोजी आंध्र प्रदेशातील एका व्यापाऱ्याला तांब्याच्या ताराचे भंगार विकण्याच्या नावाखाली गंडा घालून व्यापाऱ्या कडील जवळपास १,५१,५००/- रुपयांचा मुद्देमाल लुटल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने पोऊनि गणेश देशमुख यांच्या कडे देण्यात आला होता.त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळ उपविभागीय पोलीस अधीक्षक कृष्णांत पिंगळे, नशिराबाद पोलीस स्टेशन चे एपीआय आसाराम मनोरे, एपीआय अमित बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि गणेश देशमुख यांनी पोऊनि रविंद्र तायडे ,पोहेकाँ शरद भालेराव ,प्रशांत विरणारे ,योगेश वराडे ,शिवदास चौधरी ,सागर बिडे अशांचे पथक नेमून तांत्रिक विश्लेशन व गुप्त बातमीदारा मार्फत आरोपितांची माहिती घेऊन अवघ्या चार तासात गुन्ह्याचा छडा लावून आरोपी निष्पंन्न करुन मनवेल ता.यावल येथे जंगलात जाऊन आरोपी यांना अटक करून गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील चोरीस गेलेला सर्व १,५१,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला .आरोपीतांना न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता त्यांची ७ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून कौतुकास्पद कामगीरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक जळगाव यांनी संपुर्ण टीम चे अभिनंदन केले होते आता नुकतेच भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात सुध्दा उपविभागीय पोलीस अधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी पोऊनि गणेश देशमुख व ठाणे अंमलदार व पोलीस कर्मचारी यांचे अभिनंदन केले यावेळी नशिराबाद पोलीस स्टेशन चे एपीआय आसाराम मनोरे व एपीआय अमित बागुल उपस्थित होते.

Spread the love