नशिराबाद येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी 

0
38

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – नशिराबाद येथे संत गाडगेबाबा जयंती सामाजिक उपक्रमा ने तसेच प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा यांच्या विचारांचे स्मरण करून गरिबी व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .हा कार्यक्रम धोबी गल्ली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दरवर्षी संत गाडगेबाबा जयंती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. नशिराबाद येथील न्यु इंग्लिश स्कूल चे संचालक ऍड. मोहन देशपांडे साहेब यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तरूण दुर्गा उत्सव मंडळ व नशिराबाद परिट धोबी समाज यांनी परिश्रम घेतले.

Spread the love