नशिराबाद येथे शांतता समितीची बैठक संपन्न.

0
42

प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – सुनसगाव येथून जवळच असलेल्या नशिराबाद येथील न्यु इंग्लिश स्कूल येथे नशिराबाद पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दि.२३ रोजी संध्याकाळी आगामी काळात येणारे सण उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी शांतता समितीची बैठक भुसावळ विभागीय पोलीस अधीक्षक संदिप गावीत यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी गावात सर्वधर्मीय नागरीक गुण्यागोविंदाने राहत आहेत तसेच आता येणाऱ्या गणेशोत्सव , ईद ए मिलाद ,नवरात्र तसेच नजिकच्या काळात येणारे सर्व सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलीस दला कडून करण्यात आले. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काही समस्या मांडल्या त्यांचे समाधान एपीआय मनोरे साहेब यांनी केले तसेच गावातील खड्डे बुजवणे व लाईट जाऊ नये असे प्रश्न मांडण्यात आले. यावेळी नगरपरिषद व विज वितरण कंपनी चे अधिकारी यांनी माहिती दिली. नशिराबाद येथील पत्रकारांनी गावातील खड्डे असलेला प्रश्न नगरपरिषद कडे लावून धरल्याने गावात खड्डे बुजण्याचे काम सुरू झाले आहे मात्र दगडी कस न टाकता काँक्रीटीकरण करण्याची मागणी या सभेत करण्यात आली.या सभेत गावातील सर्व राजकिय पक्षाच्या पदाधिकारी तसेच मुस्लिम समाजातील पदाधिकारी यांनी शांततेत उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले.यावेळी भुसावळ विभागीय पोलीस अधिक्षक संदिप गावीत, नशिराबाद चे एपीआय आसाराम मनोरे , पोऊनि विजय कोळी , गोपनीय चे प्रमोद पाटील , नगरपरिषद व विज वितरण कंपनी चे अधिकारी तसेच या सभेसाठी परिसरातील गावातील पोलीस पाटील , पदाधिकारी ,मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचलन खंडारे सर यांनी केले.

Spread the love