प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या नशिराबाद येथे गेल्या दोन शतकांची अखंड परंपरा असलेला खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास गुरुवार (ता. 02 ) पासून प्रारंभ होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात बारागाड्या ओढणे, कठडे मिरवणूक, लोकनाट्य व जागरण गोंधळ यासह विविध कार्यक्रम होणार आहेत.
सुनसगाव रस्त्यावर खंडेराव महाराजांचे पुरातन मंदिर आहे. दरवर्षी यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होतात. यात गुरुवारी (02/04/2026) सकाळी आठला ‘श्रीं’ची पूजा व अभिषेक आणि सायंकाळी सत्यनारायण पूजा होणार आहे. शुक्रवारी (ता.03/04/2026) सकाळी आठला महाअभिषेक व पूजन होईल. दुपारी 4 कठडे मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता भगत युवराज धोबी यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. रात्री नऊ ला प्रिया बाई रावेरकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे तसेच शनिवारी (ता.04/04/2026) सकाळी आठला ‘श्रीं’ची मूर्ती पंचामृत अभिषेक पूजन होईल. व रात्री 9 वाजे पासुन शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी चंदनपुरी यांचा कार्यक्रम होईल तसेच दिनांक 05/04/2026 वार रविवार रोजी सकाळी 8 ला श्री ची पूजा व रात्री 9 वाजे पासून भीमा भाऊ आणि रवी भाऊ व सहकारी मंडळ यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होईल गेल्या दोनशे वर्षांपासून धोबी घराण्याकडे बारागाड्या ओढण्याचा मान आहे. वैद्य प्रतिपदेला खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. पिढ्यान्पिढ्या बारागाड्या ओढण्याची परंपरा धोबी घराण्याने सांभाळली आहे. आतापर्यंत (कै.) रघू धोबी, शंकर रघू धोबी, गणपत शंकर धोबी, दामू शंकर धोबी यांनी सलग ३५ वर्षे बारागाड्या ओढल्या. त्यांच्यानंतर मोतीलाल संपत धोबी यांनी १२ वर्षे बारागाड्या ओढल्या आणि त्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ऊर्फ सुदाम धोबी यांनी पाच वर्षे बारागाड्या ओढल्या. त्यांच्यानंतर बारागाड्या ओढण्याची धुरा युवराज मोतीलाल धोबी यांच्याकडे तीन वर्षांपासून आहे. खंडेराव महाराज यात्रोत्सवाचे अध्यक्ष चंद्रकांत भोळे उपाध्यक्ष किशोर पाटील,खजिनदार ज्ञानदेव लोखंडे, लालचंद पाटील, योगेश पाटील, पंकज महाजन,प्रकाश बोंडे, किरण पाटील, मुकुंदा रोटे, विकास धनगर, विकास पाटील, चेतन बऱ्हाटे,बापु बोढरे, गणेश चव्हाण , विनोद रंधे, मनोज पाटील , कैलास व्यवहारे , किर्तीकांत चौबे व गावातील गणेश मंडळ, दुर्गोत्सव मंडळ, भजनी मंडळ, नशिराबाद नगरपालिका, नशिराबाद पोलिसांचे सहकार्य लाभत आहे.






