जळगाव संदेश न्युज नेटवर्क
नशिराबाद दि. ७ : तालुक्यातील नशिराबाद येथे माजी सरपंच विकास पाटील यांनी आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत घरवापसी करत शिवसेनेत घरवापसी केली आहे. त्यांच्या सोबत माजी ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले आहे. ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीआधी विकास पाटील हे समर्थकांसह शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याने याचा निवडणुकीतील समीकरणावर निश्चित परिणाम होणार आहे. पालकमंत्र्यांनी विकास पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचे स्वागत करून नशिराबादच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, आज अजिंठा विश्रामगृहात नशिराबाद येथील माजी सरपंच विकास पाटील यांच्यासह इतरांचा शिवसेनेत प्रवेश झाला. यात प्रामुख्याने माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश महाजन, शेख सत्तार, शेख मजीद, युसुफखान जमशेर खान, संदीप पाटील, सुपडू चौधरी, पराग देवरे , अहमद शेख सत्तार, मोईन खान युसुफखान, भुषण माळी, सय्यद सलीम रज्जाक अब्बास , सागर पाटील , जगदीश माळी , रितेश महाजन, संजू माळी , दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रवेश केला. यावेळी जय भवानी – जय शिवाजी , शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी परिसर कार्यकर्त्यांनी दनानुन सोडला. या सर्वांना शिवबंधन बांधून या सर्व पदाधिकार्यांना शिवसेनेत स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, विकास पाटील यांची आज खर्या अर्थाने घरवापसी झाली आहे. ते मूळचे शिवसैनिक होते. आणि दुसर्या पक्षात जाऊन देखील ते शिवसेनेच्याच स्टाईलने काम करत होते. त्यांच्या माध्यमातून आता शिवसेनेला बळकटी मिळाली आहे. नशिराबाद शहराला गतवैभव मिळवून देण्याचा संकल्प मी सोडला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामांना मर्यादा असल्याने येथे नगरपरिषद अस्तित्वात आली असून या माध्यमातून विकासकामांना मोठ्या प्रमाणात गती दिली जाणार आहे. या अनुषंगाने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असा आवाहन त्यांनी केले. तसेच ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, स्थानिक शिवसैनिकांनी जुन्या – नव्याच्या भेदाला थारा न देता एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. कुणी सांगली-वांगलीवर विश्वास न ठेवता शिवसेनेचा विचार नेटाने पुढे न्यावा असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तर विकास पाटील यांनी ना. गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण घरवापसी केली आहे. नशिराबादच्या विकासासाठी भाऊंच्या मनात मोठे व्हिजन असून यानुसार शहरातील कामांना गती दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.*
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे यांनी सांगितले की, नाशिराबदचा काया – पालट करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली नशिराबादकरांनी भगव्याच्या एका छताखाली एकत्र येण्याची गरज असून नगर परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन केले .
शिवसेनेच्या बळकटीकरणासाठी प्रयत्नशील : विकास पाटील
याप्रसंगी बोलतांना माजी सरपंच विकास पाटील म्हणाले की, मी मूळचा शिवसैनिक होतो. आज पुन्हा स्वगृही परतल्याचा नक्कीच आनंद आहे. ना. गुलाबरावजी पाटील यांनी नेहमीच विकासाभिमुख भूमिका घेतली आहे. आम्ही विरोधात असतांनाही त्यांची नेहमी सहकार्याचीच भावना होती. आता नशिराबाद हे नगरपरिषदेत रूपांतरीत होत असतांना पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत येथे भगवा झेंडा फडकावण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर आहे. आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली पालिका निवडणुकीत विजय संपादन करून येथे विकासाचे नवीन पर्व सुरू करण्याची ग्वाही विकास पाटील यांनी याप्रसंगी दिली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे , तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण , धोंडू जगताप, माजी सभापती नंदलाल पाटील, रमेश आप्पा पाटील, शहरप्रमुख विकास धनगर , उप तालुका प्रमुख दगडू माळी, चंद्रकांत भोळे, असलम सर, कैलास नेरकर, विनायक धर्माधिकारी, चेतन बरहाटे, विजय वाणी, बापू चौधरी, मधुकर मिस्त्री, प्रभाकर पैलवान , डॉ. मयूर चौधरी, उल्हास चौधरी, अविनाश घोडकर, परेश माळी , नोमदास रोटे, चंदू पाटील, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले तर आभार रामेशअप्पा पाटील यांनी मानले.