दिपक नेवे
यावल -दि.27/8/2021 शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता काँग्रेस भवन धुळे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा फौंडेशनची नाशिक विभागीय बैठक राष्ट्रीय को ऑरडीनेटर ( दिल्ली ) मा. प्रणयजी विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी पक्ष संघटन,युवक,महिला, दलित,आदिवासी,अल्पसंख्यांक, आणि इतर समाजातील घटक याना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात आले तसेच महिला,युवक यांचे प्रश्न सोडवणेकमी निर्धार करून येणाऱ्या नगरपालिका, पस, जिप, आणि इतर निवडणूक कामी चर्चा करण्यात आली यावेळी प्रणयजी विचारे यांनी जळगाव जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल हे करीत असलेल्या लोकहिताच्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले यावेळी काँग्रेस एक पक्ष नसून विचार असल्याचे मान्यवरांनी सांगितले आणि काँग्रेस सेवा फौंडेशनची वाढणारी ताकत हेच आपलं यश असल्याचे त्यांनी सांगितले सदर बैठकीत नाशिक विभागीय अध्यक्षा प्राजक्तामॅडम देसले,अनिलजी जाट,धुळे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे,जळगाव जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल,जिल्हामीडिया प्रमुख तथा कोरपावली सरपंच विलासजी अडकमोल, जिल्हाउपाध्यक्षा मीनाक्षीमॅडम जावरे, धुळे जिल्हाध्यक्ष मोहित खैरनार,कमलेश पाटील,मोहित पाटील,सह काँग्रेस सेवा फोउंडेशनचे सर्व नाशिक विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते …