राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेसाठी आकाश धनगर यांची निवड

0
52

जळगांव : पंजाब राज्यातील लुधियाना येथे ११ ते १४ मार्च २०२२ येथे पार पडत असलेल्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत आकाश धनगर याची निवड करण्यात आले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करत आकाश धनगर यानी सिल्वर मेडल प्राप्त केले होते.

राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत तुंगल, रेगु, गंडा, ट्याडिंग चार प्रकारात पार पडत आहे. पिंच्याक सिलाट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट चा प्रकार असून स्वसंरक्षणाच्या दृष्टीने सर्वात प्रभावी मार्शल आर्ट आहे. विशेष म्हणजे हा खेळ केंद्र शासनाच्या ५% नोकरी आरक्षणात आहे. तसेच या खेळाला ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार, भारतीय खेळ प्राधिकरण, भारतीय विश्वविद्यालय संघ, ऑल इंडिया पोलीस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड इ. मान्यता आहे.

निवडीसंदर्भात राष्ट्रीय पिंच्याक सिलाट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले यांनी अभिनंदन केले.

जळगांव जिल्हा असोसिएशनच्या वतीने स्पर्धेसाठी अ‍ॅड.राहूल वाकलकर, डॉ.अभिषेक पाटील, प्रतीक शुक्ला, स्वप्निल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आकाश धनगर यांच्या निवडीसंदर्भात विविध स्तरातून कौतुक होत आहे.

Spread the love