भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जळगाव तालुका तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयात नवरात्री उपक्रम’

0
55

जळगाव – :आज दि.10 रविवार रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे नवरात्री निमित्त नवजात मुलींना भेट स्वरूपात ड्रेस वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला,

या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जळगाव तालुका च्या वतीने नवीन नवजात मुलींना ड्रेस वाटप करून बेटी बचाव बेटी पढाव या विषयी जनजागृती करण्यात आली,

जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे जवळपास 30 नवजात मुलींना ड्रेस चे वाटप करण्यात आले,

‘सदर उपक्रम भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे जिल्हा समनव्यक इरफान पिंजारी यांच्या संकल्पनेतून तथा मार्गदर्शनातून संपन्न झाला’,

कार्यक्रमासाठी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे जिल्हा सचिव कोमल पाटील,जिल्हा समन्वयक इरफान पिंजारी,विद्या कोळी, नयनकुमार पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष तुषार विसपुते, महासचिव सदफ शेख, सचिव डॉ प्रसाद साटम, इलियास पिंजारी यांनी परीश्रम घेतले,

Spread the love