बौद्ध धम्माच्या स्थापनेने नव्या क्रांतीचा उदय झाला : जयसिंग वाघ 

0
23

जळगाव :- बुद्ध पूर्व काळाचा विचार केला तर असे दिसून येते की , अनेक देशांत गणराज्य प्रणाली होती मात्र या गणराज्य व्यवस्थेत सुध्दा समता , स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, शांतता, अहिंसा , स्त्री – पुरुष समानता , मानवी मूल्य या तत्त्वांचा अभाव होता. मात्र सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी बौद्ध धम्माची स्थापना करून या सर्व मूल्यांची स्थापना करून त्याची शास्त्र शुद्ध पद्धतीने संघीय स्वरूपात अंमलबजावणी केली त्यामुळे जगभरात एका नव्या क्रांतीचा उदय झाला असे अभ्यासपूर्ण विवेचन प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले .

अजिंठा हाउसिंग सोसायटी तर्फे जेतवन बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमा अर्थात बौद्ध धम्म स्थापना दिनानिमित्त दिनांक १० जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.

जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की, आषाढ पौर्णिमेला सारनाथ येथील मृगदाय वनात बुद्ध, धम्म, संघ या त्रिरत्नाची निर्मिती झाली. गौतम बुद्ध यांनी आपल्या तत्वांतून जो मानवतावाद निर्माण केला तो सर्व जगभरात आदर्शवत ठरला व अनेक देशात मानवतावादाच्या प्रस्थापने करिता राजकीय क्रांत्या झाल्या.

बौद्ध जनतेने आषाढ पौर्णिमा हा दिवस बौद्ध धम्म स्थापना दिवस म्हणून सणा सारखा साजरा करावा असेही आवाहन वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन दिलीप सपकाळे होते त्यांनी आषाढ पौर्णिमेचे बौद्ध धर्मात अनन्य साधारण महत्व असल्याचे सांगितले. भारतीय बौद्ध महासभेच्या शहर अध्यक्षा ज्योती भालेराव यांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जीवनात व बौद्ध धर्मात अनेक महत्वपूर्ण घटना आषाढ पौर्णिमेला घडलेल्या आहेत. वर्षावासाची सुरवात याच दिवसापासून झालेली आहे. खुद्द गौतम बुद्ध यांनी ४५ वर्षावास केलेले आहेत असे सांगितले. विजया शेजवळे, ॲड. आनंद कोचुरे, दिलीप तासखेडकर , नथू अहिरे यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीस संचालक प्रवीण नन्नवरे, सुनील बिऱ्हाडे, विशाल साळुंखे यांच्या हस्ते भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तसेच कविता सपकाळे, सुमन बैसाणे, वर्षा कोचुरे नूतन तासखेडकर यांनी त्रिसरण, पंचशिल म्हटले . कार्यक्रमानंतर लता बिऱ्हाडे यांच्या तर्फे खीर दान झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्वला तायडे , राधा जवरे, सुनंदा वाघ, कमल सोनवणे, सिंधू तायडे, शेखर तायडे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास विमल भालेराव, सीमा सैंदाणे, अंजना भालेराव, हिराबाई भालेराव, कल्पना तायडे, भारती अहिरे, भारती सपकाळे, सरला भालेराव, जमुनाबाई सावळे, गीता सोनवणे, वत्सला वानखेडे, मीनाक्षी शेजवळे, प्रमिला सोनवणे, शालिनी नितोने, संगीता सैंदाणे, जयश्री पाटील, मीनाक्षी तायडे, कल्पना नन्नवरे, संजनी सैंदाणे, प्रतिभा बनसोडे, सोनी गजरे तसेच स्त्री पुरुष मोठ्यासंख्येने हजर होते.

Spread the love