दिपक नेवे
यावल -आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात क्लीन इंडिया प्रोग्राम विषयी सविस्तर मीटिंग झाली. या मीटिंग मध्ये जळगाव जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत साहेब, जळगाव महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी साहेब, जळगाव जि. प. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील साहेब, फॉरेस्ट अडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर गणेश वळवी साहेब, रेडक्रॉसचे सर्वेसर्वा गणी मेमन साहेब, नेहरू युवा केंद्राचे ऑफिसर नरेंद्र डागर साहेब, नेहरू युवा केंद्र अकाऊंटंट अजिंक्य गवळी सर, नेहरू युवा केंद्र युथ लीडर तेजस पाटील, नेहरू युवा केंद्र समन्वयक रोहन अवचारे, नेहरू युवा केंद्र कर्मचारी गौरव जी यासोबत जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी व नेहरू युवा केंद्राचे सर्व तालुका समन्वयक ऑनलाईन पद्धतीने मीटिंग ला हजर होते. यावेळी ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणाऱ्या क्लीन इंडिया प्रोग्रामचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन व सुरुवात यावल शहरात येत्या 2 ऑक्टोबरला होणार आहे












