न्हावी ग्रामपंचायती मध्ये दलीत वस्ती सुधार योजनेच्या निधी वापरात झालेल्या गैरव्यवहाराच्या विरोधातील भीम आर्मीचे आंदोलन चौकशी समितीच्या आश्वसनानंतर स्थगित..

0
15

दिपक नेवे

यावल -तालुक्यातील न्हावी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहारा संदर्भातील माहीती मिळावी आणी या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर चौकशी होवुन कार्यवाही व्हावी या मागणी करीता भीम आर्मी यावल तालुका व जळगांव जिल्हा युनिटच्या वतीने होणारे आजचे बेमुदत जन आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

भीम आर्मीच्या तक्रारींची तात्काळ दखल घेत यावल गटविकास अधिकारी डॉ निलेश शांताराम पाटील यांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशी कामी एक समिती नियुक्त केली असुन,चौकशी समितीत पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे व भीम आर्मी च्या पदाधिकारीयांच्या मध्ये या विषयास घेवुन सविस्तर चर्चा झाली व चौकशी समितीचे संबधीत अधिकारी यांना सर्व गैरकारभार विषयी माहीती देण्यात आली . या संदर्भात भीम आर्मीच्या वतीने न्हावी ग्रामपंचायतीस अल्टीमेटम देण्यात आले असुन , जर प्रशासकीय पातळीवर आठ दिवसातच चौकशी समितीने चौकशी करून अहवाल सादर नाही केला तर दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी भीम आर्मी यावल तालुका जळगांव जिल्हा युनिट तर्फे प्रांताधिकारी कार्यालय फैजपूर यांच्या दालनात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल भीम आर्मी यावल तालुका अध्यक्ष हेमराज तायडे यांनी दिला इशारा जळगांव जिह्यात लागू असलेले कोरोणा महामारी मुळे, पोलीस अधिनियम १९४९ कलम ३७ /३व७नुसार भीम आर्मी ने केला संविधानाचा सन्मान,आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असुन, या प्रसंगी भीम आर्मी राज्य प्रवक्ते रमाकांत जी तायडे, महाराष्ट्र राज्य सचिव सुपडू संदानशिव,यावल तालुका अध्यक्ष हेमराज तायडे,यावल कोषाध्यक्ष शिवाजी गजरे व प्रवीण सावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love