निवडणुकीत नामनिर्देशन पत्रात माहिती लपवल्याने ममुराबाद येथील 11 सदस्यांनवर अपात्रतेची टांगती तलवार…

0
18

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

ममुराबाद – येथे एक वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करताना ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या अकरा सदस्यांनी जंगम व स्थावर मालमत्तेची माहिती पूर्ण भरलेली( लपविल्याने ) नसल्याने

दिनांक ११/०१/२०२२. श्री. ज्ञानेश्वर अरुण पाटील, तसेच गफुर मोती पटेल व इतर ३ रा.ममुराबाद ता. जि. जळगाव यांनी वरिल 11 सदस्यांनी अतिक्रमण केलेले असल्याबाबत. तसेच राज्य निवडणूक आयोगाची दिशाभूल करणे, खोटी माहिती सादर करणे, निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन न करणे मुळे अपात्रतेची कारवाई होणेसाठी तक्रारी अर्ज दाखल केलेला होता.

त्या अनुषंगाने खालील सदस्य १.श्री. विलास गुलाब सोनवणे, सदस्य २.श्रीम. लताबाई अशोक तिवारी, सदस्य ३.श्रीम. रंजना जितेंद्र ढाके, सदस्य ४.श्री. हेमंत यशवंत पाटील, सदस्य ५. श्री. शैलेश यशवंत पाटील, सदस्य ६.श्रीम. अंजनाबाई सुरेश शिंदे, सदस्या ७. श्री. गोपाळ कृष्णा उखा मोरे, सदस्य ८. श्री. संतोष रामदास कोळी, सदस्य ९. श्रीम. साधना सुनिल चौधरी,१०. श्रीम. आरती सचिन पाटील, सदस्या ११. श्रीम. सुनिता अनंत चौधरी, सदस्या १२. श्री. अमर गंगाराम पाटील, सदस्य. आपले लेखी म्हणणे अथवा पुरावे सादर करणेकामी दिनांक २२/०२/२०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय ममुराबाद ता. जि. जळगाव येथे उपस्थित राहावे. तसेच सदर दिनांकास आपण उपस्थित न राहिल्यास आणि आपला लेखी खुलासा व सदर बाबतचे पुरावे सादर न केल्यास होणाऱ्या परिणामास आपण वैयक्तीक जबाबदार रहाल अशा आशयाच्या पत्र गटविकास अधिकारी यांचे मार्फत देण्यात आले आहे .

सदस्यांनमध्ये घबराटीचे वातावरण,,

नुकत्याच राज्यमंत्री बच्चु कडु यांनी निवडणुकीच्या वेळेस नामनिर्देशन पत्र दाखल करतांना माहिती लपवल्याची तक्रार एका याचीका कर्त्याने दाखल केल्यानंतर यांचेवर झालेल्या कारवाईमुळे ममुराबाद येथील सदस्यांनमध्ये घबराटीचे वातावरण पहावयास मिळत आहे.

Spread the love