भुसावळ – येथून जवळच असलेल्या वांजोळा – भुसावळ रस्त्यावर निलगाय ( नर ) मृतावस्थेत आढळला या निलगायीचा मृत्यू नेमका कशाने झाला हे समजू शकले नसले तरी एखाद्या मोठ्या वाहनाची धडक लागली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. ही घटना दि २५ मार्च रोजी सकाळी घडली असल्याचे बोलले जात आहे या बाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील वन्यप्राणी मित्र व सर्पमित्र अजय खरोटे , राहुल पथरवाट , गणेश भोई यानी सहकार्य केल्याचे समजते.