रावेर – मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सराटी ता. अंबड येथे शांततेत उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी बेशुट व अमानुष लाठी हल्ला केल्याच्या निषेधार्थ वडगांव फाटा रस्ता ( बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर ) महामार्गावर निंभोरा बु व वडगांव येथील मराठा समाज बांधवानी रास्ता रोको करीत आंदोलन केले.
या वेळेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध नोंदविण्यात आला. वडगांव फाटा रस्त्यावर बुधवार सकाळी 10.वाजता आंदोलनास सुरुवात झाली.
सराटी येथील मराठा आंदोलकांवर पोलिसांचा अमानुषपणे लाठी चाराच्या निषेधार्थ वडगांव येथील सरपंच धनराज देविदास पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा सादर करून आंदोलनास पाठिंबा दिला.
मराठा समाजाला सर सकट कुणबी प्रमाणपञ देण्यात यावे.तसेच मराठा समाजावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्या सर्व पोलीसांना निलंबित करण्यात यावे. असे निवेदन शासन दरबारी निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांना देण्यात आले.
यावेळी माजी सरपंच डिगंबर चौधरी, नितीन पाटील, प्रमोद कोंडे, धनराज पाटील सरपंच वडगांव,वाय. डी.पाटील, स्वप्निल गिरडे,पवन चौधरी,संजय सोनवणे, डॉ. मनोहर पाटील, राजीव बोरसे,हेमंत पवार,सुरेंद्र सोनवणे, चैतन्य कोंडे, योगेश चौधरी, अमोल पाटील, बाळू विचवे, पंढरी महाले, हेमंत पाटील, पियुष पाटील, रविंद्र विचवे,गुणवंत उंबरकर,राहुल गुरव, विष्णु कोळे, तसेच निंभोरा रिक्षा स्टॉप युनियन यांच्या सह सकल मराठा समाजातील नागरिक व आदि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थितीत होते. निंभोरा पोलीस स्टेशन तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.महामार्गावर दोन्ही साईड ला होती. आंदोलन शांततेत पार पडले.