रावेर प्रतिनिधी– राजेंद्र महाले– तालुक्यातील निंभोरा खिर्डी शिवारातील जुना रस्ता हा 30 ते 40 वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्थेत होता त्यात गेल्या दोन वर्षापासून या रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असून त्यातील काम सुरू असताना रेल्वे विभागाने पाईप काढून टाकल्याने त्या अत्यंत खोलगट रस्त्याने पाणी साचले आहे कारण त्यामुळे त्या भागातील 550 ते 600 एकर शेती असून त्यात 250 ते 300 शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यात आता आणखी चांगलं काढणे आणि केळीची वाहतूक करणे अत्यंत त्रासदायक झाले आहे त्यातच केळीच्या प्रत्येक घडाला आम्हाला 20 ते 22 रुपये वाहतूक द्यावी लागत आहे या सर्व बाबींमुळे आम्ही अत्यंत त्रासले असून शेती करणे जिकरीचे झाले आहे आम्हाला आमचा रस्ता दुरुस्त करून मिळावा म्हणून रावेर लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना निवेदन दिले निवेदन देताना माजी सरपंच प्रगतिशील प्रगतशील शेतकरी दिगंबर दादा चौधरी किशोर चौधरी विलास दोडके जगन्नाथ दोडके अंबादास धोंडू चौधरी विजय पवार संतोष कोंडे यांच्यासह 250 ते 300 शेतकरी उपस्थित होते.