निंभोरा येथील डॉ दिलीप झोपे यांचा खान्देश गौरव पुरस्काराने सन्मान

0
49

निंभोरा प्रतिनिधी–
रावेर -तालुक्यातील निंभोरा येथील वैद्यकीय व्यवसायात सुपरिचित असलेले डॉ दिलीप झोपे यांना आयुषशास्त्रातील जागतिक संघटना असलेल्या आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व सुवर्ण पुनर्वसू आयुर्वेद,जळगाव यांच्या वतीने जळगाव येथे ३१ ऑक्टोबर रोजी खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जळगाव येथे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते डॉ दिलीप झोपे यांना सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी खा.उन्मेष पाटील,माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांनी प्रमुख उपस्थिती होती.वैद्यकीय शास्त्रातील चिकित्सकांच्या योगदानाची दखल घेत डॉ झोपे यांना खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सतीश कराळे, उपाध्यक्ष डॉ नितीन राजे पाटील, डॉ राकेश झोपे,डॉ हर्षल बोरोले,डॉ लीना बोरोले,डॉ वीरेंद्र गिरासे,यांची ही उपस्थिती होती.निंभोरा परिसरासह ग्रामीण भागातही गेल्या ३० वर्षापासून डॉ दिलीप झोपे वैद्यकीय सेवा देत असून त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Spread the love