निंभोरा येथील स्वानंद कृषी विज्ञान मंडळाचे सदस्य रविंद्र भोगे शेतकरी पुरस्काराने सन्मानित.

0
51

रावेर प्रतिनिधी–राजेंद्र महाले –-रावेर तालुक्यातील निंभोरा येथील स्वानंद कृषी विज्ञान मंडळाचे सदस्य तथा प्रगतिशील शेतकरी रविंद्र वसंत भोगे यांना खा. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते साप्ताहिक कृषीसेवक चा राज्यस्तरीय “युवा शेतकरी पुरस्कार” प्रदान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास जि.प.अध्यक्षा ना.रंजनाताई पाटील, माजी आ.अरुण दादा पाटील,तहसीलदार उषाराणी देवगुणे,जैन इरिगेशन जळगावचे उपाध्यक्ष तथा केळीतज्ञ डॉ.श्री.के बी पाटील,राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,भाजपा युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन,कामगार नेते दिलीप कांबळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत साप्ताहिक कृषीसेवक चा राज्यस्तरीय “युवा शेतकरी पुरस्कार” रावेर येथे प्रदान करण्यात आला. याबद्दल त्यांचे गुणवंत भंगाळे,सुनील कोंडे,सुधीर मोरे,गिरीश नेहेते,मोहन भंगाळे,हेमंत भंगाळे,राजीव भोगे,विनोद बोंडे,ग्रा पं सदस्य दिलशाद शेख,दिलीप सोनवणे आदींनी अभिनंदन केले.

Spread the love