यावल – : तालुक्यातील डोंगर कठोरा ग्रामपंचायतीच्या च्या वसुली निधी मधून गावातील अपंग बांधवाना अद्यापपर्यन्त कोणताच प्रकारचा लाभ दिला गेला नाही परंतु सन 2021 ते 2022 मध्ये अपंग बांधवांच्या मागणी व पाठपुरावा केल्याने ग्रामपंचायतीने सर्वानुमते ठराव करूण अपंगासाठी सभा गृह मंजूर करण्यात आले होते. त्या सभागृहाचे बांधकामाचा ठेका भाग्यश्री महेश पाटील यांना देण्यात आला होता. त्या बांधकामासाठी चार लाख अळोतीस हजार रुपये अदा करण्यात आले परंतु सभागृहाचे काम अद्यापावेतो 50 %च झाले आहे. ठेकेदाराला अदा केलेल्या रकमेबाबत ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी एकाही सदस्याला विश्वासात न घेता परस्पर सदर रकमेची विल्हेवाट लावण्यात आली आहे. संबधीत ठेकेदाराला दिलेला चेक किती रकमेचा व कोणत्या तारखेला दिला या बाबत आजही सन्माननिय सर्व सदस्य संभ्रमात आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते जुम्मा रशीद तडवी यांनी सदर सभागृहाच्या प्रकरणी 2 दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे टपाला द्वारे पत्र व्यवहार केला आहे.सभागृहाच्या तक्रारीबाबत सरपंच नवाज तडवी, ग्रामसेवक शांताराम तिडके, व संबंधित ठेकेदार यांचेवर जिल्हाधिकारी तसेच गटविकास अधिकारी काय कार्यवाही करतील याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.