प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री खंडेराव मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृध्द महिला जखमी झाल्याची घटना घडली. येथील रहिवासी गं भा चंद्रभागाबाई चावदस पाटील ( वय ७६ ) आपल्या घराजवळ जात असताना अचानक भटक्या कुत्र्याने मागून येऊन उजव्या पायाच्या पोटरीला चावा घेत गंभीर जखमी केले.विशेष म्हणजे दोन तीन वेळा चावा घेतला त्यामुळे कुत्र्याच्या दातामुळे गंभीर जखमा झाल्या आहेत.त्यांच्यावर गावात प्रथोमपचार करून सामान्य रुग्णालय जळगाव येथे पाठविण्यात आले.
सुनसगावात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे गल्लोगल्ली कुत्र्यांचे घोळके दिसत आहेत त्यामुळे अशी घटना होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे बोलले जात आहे.







