दि.८ मे रोजी प्रांत कार्यालयासमोर कोळी समाजाचा अन्नत्याग सत्याग्रह. “समाजासाठी वाटेल ते करू..जिंकू किंवा मरू” जगन्नाथ बाविस्कर यांचा निर्धार.. 

0
12

चोपडा (प्रतिनिधी):-तालुक्यातील आदिवासी टोकरेकोळी जमातीच्या न्याय व हक्कांसाठी दि. ८ मे २०२३ (वार सोमवार) रोजी स.११ वाजेपासून मागण्या मंजूर होईपर्यंत अमळनेर येथील उपविभागीय (प्रांत) अधिकारी कार्यालयासमोर शेकडोंच्या संख्येने तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येणार असून, “समाजासाठी वाटेल ते करू- जिंकू किंवा मरू”, असा पक्का निर्धार चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी केला आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर यांचेहस्ते तहसीलदार अनिल गावित यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदनात चोपडा (अ.ज.) विधानसभा मतदारसंघातील आदिवासी कोळी जमातीला टोकरेकोळी (एसटी) चे जातप्रमाणपत्र मिळावे, यासह इतरही मागण्या नमूद आहेत.

याप्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, सामा. कार्यकर्ते लखिचंद बाविस्कर, जगन्नाथ बाविस्कर, प्रल्हाद ठाकरे, मोतीलाल रायसिंग, भरत पाटील विदगावकर, अशोक बाविस्कर, कैलास बाविस्कर, विठ्ठल कोळी, नवल देवराज, विजय बाविस्कर, भगवान बाविस्कर, अरुण केशव कोळी, रामचंद्र बाविस्कर, भास्कर कोळी, भिका बाविस्कर, दिनकर सपकाळे, अनिल कोळी, विशालराज बाविस्कर, अमोल सोनवणे, जयराम शिरसाठ, गोपाल बाविस्कर, शरद सोनवणे, लक्ष्मण बाविस्कर, प्रशांत सोनवणे, लीलाधर कोळी, वाल्मीक कोळी, विशाल इंगळे, विनोद सोनवणे, जितेंद्र कोळी, ज्ञानेश्वर कोळी, संदीप पाटील, संजय देशमुख, दिनेश पवार, अशोक कोळी, रामकृष्ण इंगळे, मधुकर कोळी, सतीश ठाकरे, बाळू कोळी, एकनाथ कोळी, हिमालय कोळी, वैभवराज बाविस्कर, मोतीलाल कोळी, रवींद्र कोळी, राहुल सोनवणे, नंदलाल मराठे, भास्कर इंगळे, लक्ष्मण बाविस्कर, सत्यजित सपकाळे, कृष्णा इंगळे, धनराज कोळी, अशोक सपकाळे, देविदास इंगळे, विलास इंगळे, संजय इंगळे, रवींद्र सोळुंके, बाळू बाविस्कर, चंद्रकांत कोळी, भरत आत्माराम बाविस्कर यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love