संत रविदास जयंती निमित्त २४ रोजी दीपनगर येथे व्याख्यानाचे आयोजन

0
48

भुसावळ – श्री संत शिरोमणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समिति , दीपनगर तर्फे दिनांक २४ फेब्रूवारी २०२४ रोजी नवीन क्लब, दीपनगर येथे सकाळी १०.३० वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता मोहन आव्हाड, मुख्य अतिथि आमदार संजय सावकारे तर व्याख्याते म्हणून प्रसिद्ध साहित्तीक तथा विचारवंत जयसिंग वाघ उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास राजेंद्र बावस्कर, रविंद्र सोनकुसरे, मनोहरराव तायडे, अशोक भगत, मुकेश मेश्राम, रविंद्र डांगे आदिंसह काही अधिकारी मोठ्या संखेने हजर राहणार आहेत.

संत रविदास यांच्या विविध विचारांवर तसेच कार्यावर जयसिंग वाघ हे आपले विचार मांडनार आहेत, या कार्यक्रमास जनतेने मोठ्या संखेने हजर रहावे असे आवाहन समिति तर्फे करण्यात आले आहे.

Spread the love